वायनाड पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार ठरला

केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी विरोधात भाजपने इंजिनिअर असलेल्या नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.
वायनाड पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार ठरला

केरळ : केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी विरोधात भाजपने इंजिनिअर असलेल्या नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून येथील लढत आता रंगतदार होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

नव्या हरिदास या ३९ वर्षाच्या असून त्या मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्यांचे पती शोभीन श्याम आहेत. नव्या यांनी केएमटीसी इंजिनियरिंग कॅालेजमधून २००७ मध्ये बी.टेक केले. त्या भाजप महिला मोर्चाचे राज्य महासचिव आहेत. २०२१ मध्ये त्यांनी कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण, त्यांचा त्यात पराभव झाला. त्या तिस-या क्रमांकावर होत्या. 

राहुल गांधी रायबरेली आणि वायनाडमधून लोकसभेची निवडणूक जिंकले. नियमानुसार एकाच मतदारसंघात खासदार राहता येते. यामुळे राहुल यांनी वायनाडचा राजीनामा दिला. आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. प्रियांका गांधी काँग्रेसच्या वायनाडमधील उमेदवार आहेत. आता वायनाड पोटनिवडणूकीत नव्या हरिदास विरूद्ध प्रियांका गांधी अशी लढत पाहायला मिळणार आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version