मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातात अवघे काही तास शिल्लक असताना, भाजपने अत्यंत गोपनीय पद्धतीने आपल्या उमेदवारांना 'एबी' फॉर्म (AB Form) वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या संभाव्य यादीत 125 उमेदवारांचा समावेश असून, यामध्ये पक्षाने जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांऐवजी नव्या दमाच्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे.
दादर येथील भाजपचे मुख्यालय 'वसंत स्मृती' येथे रविवारी मध्यरात्रीपासूनच राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. पहाटेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा ज्या ठिकाणी सुटला आहे, अशा जागांच्या उमेदवारांना तातडीने निरोप देऊन बोलावून घेण्यात आले. रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेली ही एबी फॉर्म वाटपाची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती, ज्यावरून भाजपने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, याची प्रचिती येते.
यादरम्यान पहिला एबी फॉर्म तेजस्वी घोसाळकर यांना देऊन भाजपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या वॉर्ड क्रमांक दोन मधून नशीब आजमावणार आहेत. त्यांच्यासोबतच अर्चना भालेराव यांच्यासह सुमारे 15 उमेदवारांनी पहाटेपर्यंत आपले अधिकृत उमेदवारी पत्र स्वीकारले. मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपने अनुभवी माजी नगरसेवक आणि नवीन युवा नेतृत्व यांचा एक सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहोचवता येईल.
महत्त्वाच्या उमेदवारांच्या नावावर नजर टाकल्यास, मुलुंड पश्चिम (वॉर्ड क्रमांक 107) मधून नील सोमय्या हे रिंगणात उतरणार आहेत, तर वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना आपली ताकद आजमावतील. जुन्या फळीतील नेत्यांपैकी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर नवनाथ बन प्रभाग क्रमांक 135 मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या नावांवरून हे स्पष्ट होते की, पक्षाने विभागातील जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता (Electability) या दोनच निकषांना प्राधान्य दिले आहे.
भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार
वॉर्ड क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर
वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह
वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल
वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव
वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा
वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी
वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना
वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम
वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर
वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर
वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड
वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी
वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव
वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत
वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर
वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला
वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती
वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या
वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग
वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार
वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा
वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव
वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत
वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते
वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ
वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे
वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक – 172 – राजश्री शिरोडकर
वॉर्ड क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया
वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा
वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे
वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील
वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित
वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर
भाजपने यंदा 'मिशन 150' चे मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे. मुंबई महापालिकेवर आपला ध्वज फडकवण्यासाठी प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारून नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अर्थात, या निर्णयामुळे पक्षात काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या उमेदवारांवरच पक्षाने बोली लावली आहे. मुंबईच्या या सत्तेच्या महासंग्रामात भाजपने केलेली ही मोर्चेबांधणी विरोधकांसाठी किती मोठे आव्हान ठरते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईच्या राजकीय मैदानात नेमकी कोणती उलथापालथ होते आणि 'वसंत स्मृती'तून निघालेले हे शिलेदार 'बीएमसी'च्या मुख्यालयापर्यंत पोहोचतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.