अंबरनाथमध्ये कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले. भाजपसोबत छुपी युती केल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या तब्बल 12 नवनिर्वाचित नगरसेवकांना निलंबित केले होते. काँग्रेसनं नगरसेवकांना निलंबित करताच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत त्यांनी केला आहे. तसेच शिंदेंच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने काँग्रेसबरोबर एक प्रकारची युती केली असल्याचे मोठं विधान देखील त्यांनी केला आहे.
हेही वाचा- BMC Election: मुंबई महापालिकेत महायुतीची जोरदार मोर्चेबांधणी: 150 जागांवर एकमत, उर्वरित जागेचा तिढा शिंदे-फडणवीस सोडवणार
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “भाजपा किती बंचुका आणि ढोंगी आहे काँग्रेसने त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले, आणि कॉंग्रेस किंवा एमआयएम सोबत यूती केल्यामुळे भाजपने पण कारवाई केलं. कॉंग्रेसने त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी लगेच त्या नगरसेवकांवर ससाड्यासारखी झडप घातली. का तर तर शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी… भाजपने काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, अंतर्गत लाथाळ्या आहेत”.
“ती काँग्रेसच्या विचारांची लोक असून त्यांना काँग्रेसने पक्षातून काढताच तुम्ही त्यांनाच घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता. याला सत्तास्थापनेसाठी केलेली वैचारिक सुंता म्हणतात महाराष्ट्रात वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न. पूर्वी नेते घडवले जायचे आता ते पळवले जातात, स्वतःत क्षमता नाही, चोऱ्या लबाड्या करून. रवींद्र चव्हाण यांच्यात भागात घडले. नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लाऊन बसत नव्हते, हे MIM बरोबर बसले काँग्रेससोबत बसले, शिंदेंना काँग्रेसचा प्रचंड राग होता, याचे उत्तर द्या आता. ही वैचारिक सुंता आहे. काँग्रेस सोबत आम्ही सरकार स्थापन केले तेव्हा शिंदे आणि त्यांच्या टोळीने सत्तेचा भोग घेतला” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि रविंद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.