मुंबई : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले आहे. त्याचबरोबर प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे होणार लोकार्पण करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदिवली येथे खेल महोत्सव आयोजित केला आहे. 25 तारखेला सकाळी 9 वाजता कांदिवली येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया येथे उभारलेल्या अटलजींच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.
हेही वाचा : ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट
या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुंबईतील मंत्री आणि आमदारांचा सत्कारही होणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलाचे अयोजन करण्यात आले आहे. गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांच्या हस्ते क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार पीयूष गोयल आणि सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.