Bihar Assembely Elections 2025: निकालांपूर्वी राजकीय वातावरण तापले; राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

मतमोजणीपूर्वी RJD नेते मनोज झा यांनी बदलाचा दावा करत एग्जिट पोलची टीका केली. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी निकाल बिहारसाठी शुभ ठरेल असे सांगितले.
Bihar Assembely Elections 2025: निकालांपूर्वी राजकीय वातावरण तापले; राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

बिहार विधानसभा निवडणूक 2025 दोन टप्प्यांत पूर्ण झाली असून आता काही तासांतच निकालांची प्रतिक्षा संपणार आहे. बिहारची जनता कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला पुढील पाच वर्षांची जबाबदारी देणार, याचे चित्र दुपारपासून स्पष्ट होऊ लागेल आणि संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल समोर येईल. निकालांच्या आधीच विविध पक्षांचे नेते माध्यमांशी संवाद साधत आपल्या विजयाच्या शक्यता आणि अपेक्षा व्यक्त करत आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी सत्ता बदलाचा दावा केला. त्यांनी सांगितले की, “आम्ही बिहारच्या आशा आणि अपेक्षेसोबत उभे आहोत. बिहार बदलाच्या दिशेने जात आहे. दुपारनंतर सर्व काही स्पष्ट होईल.” एग्जिट पोलबद्दल (Exit Poll) बोलताना त्यांनी टीका केली आणि म्हणाले, “एग्जिट पोल म्हणजे कॅपिटलचा खेळ, बाजाराचा खेळ आणि शहंशहांचा खेळ. आम्ही असे खेळ खेळत नाही.”

हेही वाचा: Bihar Assembely Elections 2025 : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात; दोन हजार 616 उमेदवारांची धाकधूक वाढली

निकालांपूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आज लोकशाहीचा सर्वात ऐतिहासिक दिवस आहे. या महापर्वाचा निकाल केवळ बिहार नव्हे तर देशासाठीही शुभ ठरेल. प्रत्येक बिहारी आज अभिमानाने उभा राहील आणि विकसित बिहारची मजबूत इमारत उभी राहील.” त्यांनी पुढे म्हटले की बिहार नेहमीच देशाला दिशा देणारे राज्य राहिले असून यंदाचे निकालही मोठा संदेश देणार आहेत.

राजदचे नेते मृत्युंजय तिवारी यांनीही महागठबंधनच्या विजयाचा मजबूत दावा केला. त्यांनी म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही जिंकणार. आज डबल इंजिन सरकारची विदाई आहे आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नवी सरकार येणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की एनडीए (NDA) आता काही तासांचा पाहुणा असून दुपारनंतर त्यांची बिहारमधून निरोपाची वेळ ठरलेली आहे.

दरम्यान, जनता दल यूनायटेडचे (JDU) नेते राजीव रंजन प्रसाद यांनी विश्वास व्यक्त केला की बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नीतीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. ANI शी बोलताना त्यांनी सांगितले, “जनतेने आपला जनादेश दिला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बिहारचा विकास वेगाने पुढे नेला आहे आणि मला खात्री आहे की एनडीए पुन्हा सरकार बनवेल.” बिहारमधील 243 जागांसाठीची मतमोजणी दुपारपासून सुरू होत असून, निकाल देशभरातून पाहिले जात आहेत. बिहारची सत्ता पुन्हा एनडीएकडे जाते की महागठबंधन राज्यात बदल घडवते, हे निकालच ठरवणार आहेत.

हेही वाचा: Bihar Election Result 2025 : तेज प्रताप यादव यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी; सर्व काही व्यवस्थित असल्याची दिली माहिती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version