WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता नंबर न देता करा चॅट; ‘युजरनेम’ फिचर लवकरच होणार लाँच

WhatsApp वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी WhatsApp एक मोठी आणि महत्त्वाची सुविधा लवकरच आणणार आहे. WhatsApp सध्या 'युजरनेम' या नव्या फीचरची चाचणी करत असून काही निवडक युजर्सना ते उपलब्ध करून देण्यात आले आ
WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता नंबर न देता करा चॅट; ‘युजरनेम’ फिचर लवकरच होणार लाँच

WhatsApp वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी WhatsApp एक मोठी आणि महत्त्वाची सुविधा लवकरच आणणार आहे. WhatsApp सध्या 'युजरनेम' या नव्या फीचरची चाचणी करत असून काही निवडक युजर्सना ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे फीचर पूर्णपणे लागू झाल्यानंतर, WhatsApp चॅटिंगसाठी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज लागणार नाही.आत्तापर्यंत WhatsApp वर कोणाशीही संवाद साधण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. मात्र नवीन अपडेटनंतर युजर्स स्वतःचा एक वेगळ युजरनेम तयार करू शकतील. या युजरनेमच्या मदतीने इतर लोक तुम्हाला शोधु शकतील आणि थेट मॅसेजही करू शकतील. त्यामुळे प्रायव्हसीच्या दृष्टीने हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचा विशेषत: त्या युजर्सना फायदा होईल जे त्यांची खासगी माहिती कोणाला शेअर करत नाहीत.

हेही वाचा: EPFO New App: PF काढण्याची प्रक्रिया पूर्ण बदलणार! EPFO च्या नव्या ॲपमुळे काही मिनिटांत मिळणार पैसे

सध्या अनेकजण नवीन व्यक्तींशी संपर्क साधताना आपला नंबर शेअर करण्यास टाळाटाळ करतात. मात्र या फीचरमूळे फक्त युजरनेम शेअर करून चॅटिंग सुरू करता येणार असून वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. ही सिस्टम काही प्रमाणात Telegram आणि Instagram प्रमाणेच काम करणार आहे. मात्र या बदलामुळे स्पॅम मेसेजेस वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अनोळखी लोक युजरनेमच्या आधारे संपर्क साधू शकतात. यावर उपाय म्हणून WhatsApp कडून प्रायव्हसी सेटिंग्स देण्याची शक्यता आहे. ज्यामुळे WhatsApp युजर्स ठरवू शकतील की कोण त्यांना मॅसेज करेल. याशिवाय, हा फीचर बिझनेस आणि कंटेंट क्रिएटर्ससाठीही फायदेशीर ठरणारा आहे. नंबर सार्वजनिक न करता प्रेक्षकांशी जोडण्याचा हा एक सोपा मार्ग ठरणार आहे. जर का ही चाचणी यशस्वी झाली तर हा अपडेट WhatsApp च्या ईतिहासातील सर्वात मोठा अपडेट मानला जाईल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version