Dahi Handi 2026, Govinda Insurance: दहीहंडीपूर्वी गोविंदांसाठी मोठी खुशखबर! तब्बल 2 लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; सरकारचा मोठा निर्णय

यंदा गोकुळाष्टमीपूर्वीच गोविंदांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 2 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
Dahi Handi 2026, Govinda Insurance: दहीहंडीपूर्वी गोविंदांसाठी मोठी खुशखबर! तब्बल 2 लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; सरकारचा मोठा निर्णय

यंदा गोकुळाष्टमीपूर्वीच गोविंदांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 2 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पालघर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. दरम्यान दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी राज्यातील सुमारे 2 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावर आता दखल राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.  

हेही वाचा- Delhi Jantar-Mantar Students Viral Video : भररस्त्यात घेरलं, धर्म विचारला, शिवीगाळ केली…, राष्ट्रीय हिंदू सेनेच्या अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांना मारहाण; राऊतांच्या ट्वीटने खळबळ

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत म्हटलं होत की, “गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त राज्यातील सुमारे 2 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांकडे केली. गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. राज्यभर लाखो गोविंदा जीव धोक्यात घालून दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष दहीहंडी फोडताना अनेक गोविंदांना दुखापती होतात. अनेक गोविंदा मंडळांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने उपचाराचा खर्च उचलणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील सर्व गोविंदांना व्यापक विमा संरक्षण देण्याची आवश्यकता आहे.”

पुढे त्यांनी म्हटलं की, “यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र यंदा हा लाभ वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांना ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’ या नियोजन समितीच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी पत्रात केली आहे. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी संबंधित विभागाला याप्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. याबद्दल उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”

पुढे म्हटलं की, “गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळणार असून गोकुळाष्टमीचा उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरा होण्यास मदत होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.” राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळणार असून गोकुळाष्टमीचा उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरा होण्यास मदत होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version