नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: दिल्लीतील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. याबरोबरच आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर INDIA नावाने एकजूट झालेल्या विरोधकांना पहिल्याच परीक्षेत अपयश आले आहे. विरोधकांनी मतदानाची मागणी केली होती. मात्र मशीनमध्ये बिघाडामुळे मतदान स्लिपच्या माध्यमातून केले गेले. विधेयकाच्या बाजुने १३१ आणि विरोधात १०२ सद्यांनी आपले मत दिले. त्यानंतर मतदानानंतर विधेयक बहुमताने मंजूर झाले.
मतदानाच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकाशी संबंधित विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे विधेयक का आवश्यक आहे हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. अमित शहा यांनी सांगितले की, आम्ही हे विधेयक सत्तेसाठी आणले नाही, तर दिल्ली केंद्रशासित प्रदेश सरकारने केंद्राला दिलेल्या अधिकारावर कायदेशीररित्या अतिक्रमण आणल्याने, ते रोखण्यासाठी आणले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या बहिष्कारात सेवा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते.
शहा म्हणाले- लोकसभेत ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे, त्यामुळे विरोधकांनी ११ ऑगस्टला मणिपूरवर चर्चा करावी. मी मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. तुमच्याकडे (विरोधक) काहीतरी लपवायचे आहे. तुम्ही चर्चा होऊ देत नाही. ११ ऑगस्टला जर खर्गे यांनी चर्चेसाठी होकार दिला तर मीही त्यासाठी तयार आहे. यापूर्वी, दिल्ली सेवा विधेयकावर शहा म्हणाले की, हे विधेयक पूर्वीसारखे पंतप्रधानांचे सदस्यत्व वाचविण्यासाठी आणलेले नाही. आणीबाणीसाठी नाही आणले. शहा यांनी असे सांगताच काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले. त्यावर शहा म्हणाले- काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही देशाला आणीबाणी दिली होती. काँग्रेसला शिव्या देऊन ‘आप’चा जन्म झाला. खरगे साहेब, तुम्ही या विधेयकाला विरोध करत आहात कारण जी युती वाचविण्यासाठी तुम्ही पाठिंबा देत आहात ते केजरीवाल तुमच्याकडे पाठ फिरवतील.
एकट्याने काहीही होणार नाही हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळेच युती झाली आहे. तत्वतः एकी नसलेली युती. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे एकमेकांच्या विरोधात असले तरी युतीमध्ये इल्लू-इल्लू करत आहेत. डाव्यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचा जन्म झाला, पण तेही एकत्र आहेत. मी त्यांना सांगतो की, आणखी ४-५ पक्ष जोडले गेले तरी २४ मे २०२४ रोजी फक्त नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.