भुजबळ – पवार भेटीने चर्चेला उधाण

ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छगन भुजबळांनी राशपच्या शरद पवारांची भेट घेतली.
भुजबळ – पवार भेटीने चर्चेला उधाण

मुंबई : ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छगन भुजबळांनी राशपच्या शरद पवारांची भेट घेतली. या भेटीसाठी आधी पवारांची वेळ मागितली नव्हती. यामुळे एक तासापेक्षा जास्त वेळ वाट बघितल्यानंतर भुजबळांना पवारांची भेट मिळाली. या भेटीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. पवारांशी मराठा – ओबीसी प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले. शरद पवारांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून आरक्षणप्रश्नी चर्चा करणार असल्याचे सांगितले, असे भुजबळ म्हणाले. पण भुजबळांनी परस्पर घेतलेल्या या भेटीमुळे महायुतीतले काही नेते नाराज असल्याचे वृत्त आहे. भुजबळांनी कोणाला विश्वासात घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली, असा प्रश्न महायुतीचे नेते उपस्थित करत आहेत. यामुळे छगन भुजबळांच्या मनात वेगळा विचार आहे का, ते राष्ट्रवादी सोडून राशपमध्ये जाणार आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version