भिवंडीत दहावीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या

भिवंडीत दहावीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या

भिवंडीतील नागाव सलामतपुरा परिसरातील अन्सारी साफिया गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत असलेली दहावीची विद्यार्थिंनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहावीची चाचणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर झाल्यानंतर पाचव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

भिवंडीत अन्सारी साफिया गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत असलेली दहावीची विद्यार्थिंनीने आत्महत्या केल्याची घटना घडली.

शाळेत परिक्षा सुरू असल्यामुळे परीक्षेचा पेपर देण्यासाठी विद्यार्थिंनी शाळेत दाखल झाली.

मात्र सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास पेपर संपल्यावर विद्यार्थिंनीने पाचव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थींनी 14 वर्षाची असून मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख असे नाव आहे.

मुबाशीराने आत्महत्या का केली यासंदर्भात शाळा शोध घेत असून ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे दडपणाच्या कारणास्तव आत्महत्या केली नसल्याचे म्हटलं जात आहे.

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version