२०१८मध्ये झालेल्या भिमाकोरेगाव हल्ल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला जवाब नोंदविण्यासाठी भिमाकोरेगाव चौकशी आयोगासमोर हजर राहिले. सह्याद्री अतिथीगृहात आयोगासमोर रश्मी शुक्ला जवाब नोंदविला आहे.
भिमाकोरेगाव चौकशी आयोगाने रश्मी शुक्ला आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी साक्षीदार हर्षाली पोद्दार यांना समन्स बजाविले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष मजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते. आज आयपीएस रश्मी शुक्ला यांनी कोरगाव भीमा चौकशी आयोगासमोर हजेरी लावली असून निवृत्त न्यायाधीस जे. एन. पटेल यांच्यासमोर जवाब नोंदवला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.