भाऊराव कऱ्हाडे यांचा मोठा निर्णय

भाऊराव कऱ्हाडे यांचा मोठा निर्णय

मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :मराठी सिनेमांना अनेकदा सिनेमागृहात स्क्रीन मिळत नाही हे बऱ्याचदा पाहायला मिळतं. तर या कारणास्तव, चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार समाज माध्यमांवर राग व्यक्त करताना दिसतात. ‘ख्वाडा’, ‘बबन’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘TDM’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम सिनेमाचे प्रदर्शन रद्द केले जात आहेत. ‘टीडीएम’ चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

मात्र, सिनेमागृहात या चित्रपटाचे प्रदर्शन सिनेमागृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. असं भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितलं. मात्र, सिनेमाला दिवसभरात फक्त एक स्क्रीन मिळत असल्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुक या समाज माध्यमांवर प्रेक्षकांशी सवांद साधून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाज माध्यमांवर एक नोट शेअर केली तसेच ही नोट भाऊराव कऱ्हाडे यांच्या समाज माध्यमांवर देखील शेअर करण्यात आली आहे.

यामध्ये लिहिले आहे की, ”नम्र निवेदन रसिक प्रेक्षक हो नमस्कार,मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटर मध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार आपलाच भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आणि टीडीएम परिवार”.असं म्हणत भाऊराव कऱ्हाडे यांनी दलगिरी व्यक्त केली.ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’. ‘जेव्हा हा सिनेमा सिनेमागृहात येईल तेव्हाच आम्ही बघू’ असं म्हणत चाहत्यांनी भाऊराव यांना समर्थन केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version