Bhaskar Jadhav-Ashish Shelar: शेलार पोहोचले, जाधव निघून गेले! चिपळूणमधील नियोजित भेट हुकल्याने राजकीय चर्चांना उधाण

नियोजित असलेली आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.
Bhaskar Jadhav-Ashish Shelar: शेलार पोहोचले, जाधव निघून गेले! चिपळूणमधील नियोजित भेट हुकल्याने राजकीय चर्चांना उधाण

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान चिपळूण येथील आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, नियोजित असलेली आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांची भेट पूर्वनियोजित होती. आमदार भास्कर जाधव हे भेटीसाठी संपर्क कार्यालयात उपस्थितही होते. मात्र, आशिष शेलार यांना नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने वेळेचे काटेकोर पालन करणारे भास्कर जाधव हे त्यांच्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

यामुळे दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आशिष शेलार यांनी त्यानंतर संपर्क कार्यालयाला भेट देत तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन प्रमुख राजकीय नेत्यांची नियोजित भेट ऐनवेळी रद्द झाल्याने या घडामोडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून विविध तर्क-वितर्कही व्यक्त केले जात असून, या भेटीच्या पार्श्वभूमीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version