भंडारदऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवनी शहरातील शाळेत शिकणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला आहे.याबद्दल पोलिसांनी अधिक तपास केला आणि सर्व प्रकार उघडकीस आणला.
समोर आलेल्या माहितीनुसार, पवनीतील पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने शाळेत केलेल्या मस्तीमुळे शाळेने आई-वडिलांना घेऊन येण्यास सांगितले. शिक्षा होईल या भीतीमुळे स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मुलाने एका स्थानिक नेत्याच्या गाडीवर लिफ्ट घेत बसस्टॉपपर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्याने पुढे प्रवास करत पालकांना फोन करून चाकूचा धाक दाखवून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पालक घाबरून गेले आणि तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा – Share Market Today: कालच्या पडझडीनंतर सेन्सेक्सला मिळाला ‘बुस्टर’, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू
दरम्याने या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम आणि पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी तातडीने तपास सुरू केला. शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. अखेर तीन तासांच्या शोधानंतर मुलगा सुरक्षित अवस्थेत सापडला आणि अपहरणाचा संपूर्ण बनाव उघड झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.