मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईची लाईफ लाइन समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. संपाचा आजचा सहावा दिवस आहे. भाडेतत्त्वावरील १ हजार ६७१ बसपैकी ७०४ बस आगारातच उभ्या असल्याने प्रवाशी वाहतूक ही खोळंबली आहे. याचा फटका हा प्रवाशांना बसला आहे.
दरम्यान, बेस्टने मालवणी पोलिस ठाण्यात कंत्राटी कामगांविरोधात तक्रार दिली आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करावी अशा विविध मंगण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहक सहभागी झाले आहेत.
कंत्राटी कामगार त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांच्या मागण्या रास्त असून त्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव म्हणाले. आज बेस्टचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात बेस्ट भवनात बैठक होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासाने एसटीबसचा आधार घेतला आहे. तब्बल १५० गाड्या प्रवाशांना घेऊन धावत आहेत. प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांची देखील या संपामुळे गैरसोय झाली आहे.
बेस्टचे कायम स्वरूपी चालक कंत्राटी कामगारांच्या गाड्या चालवत असल्याने आंदोलक कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकावणे सुरू केले आहे. यामुळे पोळीसानंत तक्रार देण्यात आली असून मालवणी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.