आदिवासी संघटनांच्या मोर्चाला सुरूवात

नाशिकमध्ये आदिवासी संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झाली आहे.
आदिवासी संघटनांच्या मोर्चाला सुरूवात

नाशिक : नाशिकमध्ये आदिवासी संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चात राज्यातील विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी आहेत. पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. नाशकातील तपोवन परिसरातून मोर्चाला सुरूवात झाली आहे. हा मोर्चा आदिवासी विकास भवनावर धडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदिवासी विकास मंत्री जे.पी. गावित यांच्यासह काही नेते उपोषण करत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version