आज मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मुंबईतील वरळी डोम येथे अधिवेशन होत. यावेळी अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेतेमंडळी देखील उपस्थित होते. यात हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहळी झिरवळ, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, जय पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित होते. यावेळी प्रफुल पटेलांनी केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार कार्यक्रमादरम्यान स्टेजवर येताच प्रफुल पटेल यांनी जय पवारांना कुठे बसाव हे सांगितलं आहे. यामुळे प्रफुल पटेलांची ही कृती पुन्हा राजयकीयवर्तूळात नवं वादळ घेऊन येते का? अशी शक्यता वर्तावली जात आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया काय?
यावर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, “सुनेत्रा काकींसोबत वागतांना महाराष्ट्र बघतोय हे लक्षात ठेवा… जयला बसायची जागा कुठे द्यायची हे ते चार नेते ठरवतात… काकींच्या खांद्यावर हात ठेवतात कोणीतरी हाताला खेचून घेतं..हे बरोबर आहे का..?? सुनेत्रा काकी सक्षम महिला, पत्रकार परिषदेला त्या सामोरं जाऊ शकतात… अजित पवारांना कंट्रोल करु शकत नव्हते, सुनेत्रा पवारांना कंट्रोल करु शकतो असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज… तेच ते चार हेच एका महिला आमदारानं बोलुन दाखवलं आणि ते समोर आलं… एक पुतण्या म्हणून विनंती काकींनीही सांभाळून राहावं…”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.