नागपूर शहराच्या सीमेलगत असलेल्या हुडकेश्वर खुर्द भागात रात्री अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री कुत्रे जोरजोरात ओरडत असल्याने टॉर्चच्या प्रकाशात नागरिकांनी शोध घेतला असता त्यांना एक मोठा अस्वल दिसून आला. त्यामुळे वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी अस्वलाचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. या व्हिडिओमध्ये अस्लव स्पष्टपणे दिसत आहे. हुडकेश्वर खुर्द भागापासून समोर झाडी भाग असून उमरेड कऱ्हाडला जंगल जवळ आहे. त्यामुळे शिकारीच्या शोधात अस्वल शहराकडे आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रात्री वन विभागाने परिस्थितीचा आढावा घेतला असून अस्वल जंगलात परत कसा जाईल असा प्रयत्न वन विभाग करत आहेत. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने अस्वलाला रेस्क्यू करून जंगलात सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.