Baramati Bypoll : बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट, काँग्रेसने उमेदवार दिल्यास शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा?

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू असून उद्धव ठाकरे लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे
Baramati Bypoll : बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट, काँग्रेसने उमेदवार दिल्यास शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवार दिल्यास ठाकरे गटाची शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याऐवजी सुनेत्रा पवार यांना समर्थन देण्याचा विचार पुढे येत असल्याचे समजते.

ठाकरे आणि पवार कुटुंबांमधील जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे बारामतीतील समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये वेगळी भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत आहेत. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या इतर घटक पक्षांशी चर्चा करून सामूहिक निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version