Baba Vanga Prediction : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकणार, 2026 मध्ये अनेक संकट येणार… बाबा वेंगाच्या भाकीताने चिंता वाढली

जगात कोणतेही संकट आले किंवा येणार असेल तर त्याचा अंदाज आधीच लावलेला असतो. सर्वत्र चर्चेत असलेल्या बाबा वेंगा यांनी येणाऱ्या काळासाठी देखील अनेक भाकीत केले आहेत.
Baba Vanga Prediction : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकणार, 2026 मध्ये अनेक संकट येणार… बाबा वेंगाच्या भाकीताने चिंता वाढली

जगात कोणतेही संकट आले किंवा येणार असेल तर त्याचा अंदाज आधीच लावलेला असतो. सर्वत्र चर्चेत असलेल्या बाबा वेंगा यांनी येणाऱ्या काळासाठी देखील अनेक भाकीत केले आहेत. सध्या देशात सुरु असलेल्या महागाईवर तसेच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाईवरून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

अशातच आखाती देशातील युद्धाचे पडसाद भारतावर पडताच भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाई झाली. त्यात पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना आवाहन केले की, येत्या काही काळात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा जाणवू शकतो, तसेच लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी यासगळ्या गोष्टी जपून वापराव्या. 

हेही वाचा- Mumbai Bengaluru Train: मुंबई ते बंगळुरू प्रवाशांसाठी गुड न्यूज; पुणे, सांगली, हुबळीमार्गे धावणार नवीन एक्सप्रेस; भाडे आणि वेळापत्रक आले समोर

त्यानंतर बाबा वेंगाची एक भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकणार असून जगावर 2026 मध्ये अनेक संकट येणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. बाबा वेंगाने 2026 च्या सुरुवातीलाच एका मोठ्या युद्धाची, आर्थिक मंदी आणि जागतिक ऊर्जा संकटाची भविष्यवाणी केली होती.

त्यानुसार इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्ध पेटलं, ज्यामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक बंद झाली आणि भारतीय अर्थव्यवस्था डगमळली. त्यानुसार आता येत्या काळासाठी बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीमुळे चिंता वाढली आहे. एकीकडे महागाई वाढली असून त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. अशातच सर्वसामान्यांना हैराण करणारे भाकीत बाबा वेंगाने केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version