गेल्या काही अनेक दिवसांपासून रामदेव बाबा हे चर्चेत होते. रामदेव बाबाची कोरोनावर औषधी काढल्यानंतर तर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. शिवाय चेनत भगतने देखील रामदेव बाबांची खिल्ली उडवली होती. आता रामदेव बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रामदेव बाबानी अॅलोपथी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता त्यांनी कोरोना वॉरियरवर निशाणा साधला आहे. ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा हे नेहमीच अॅलोपथी औषधीवर टीका करतांना दिसतात. आता वक्तव्यामुळे त्यांनी देशभरात वाद उभा केला आहे. जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे. (Ramdev Baba once again Controversial statement on Doctors.) कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. रामदेव बाबाला सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी चांगलचं सुनावलं आहे.
योग गुरु बाबा रामदेव यांनी एका योग शिबिरातील तरुणासोबत झालेल्या चर्चेचा हवाला देऊन डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे. तसेच १००० हून अधिक डॉक्टर कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. रामदेव बाबा या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, डॉक्टर बनायचे असेल तर रामदेव बाबासारखे बना. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाहीय, परंतू सर्वांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री, डिग्निटी आय अॅम अ डॉक्टर. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आयएमएने आक्षेप घेतला आहे. आयएमएने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना रामदेव बाबांवर कारवाई करण्याची मागणी केली असून रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी फटकारलेले आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं”, असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. डॉ. हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला होता.
त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशननेही रामदेवबाबांविरोधात आवाज उठविला आहे. तसेच आयएमएने पतंजली संस्थापक रामदेवबाबा यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी डॉक्टरांनी देखील रामदेवबाबा आणि पतंजलीचा निषेध केला. सोशल मीडियावरही रामदेवबाबांविरोधात एक मोहीम सुरू आहे. रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. सध्याला रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बाबाच्या या व्हिडिओत ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे. रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल करणं सुरू केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई होणार नाही म्हणून ते असे वक्तव्य करीत आहेत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.