6 ऑगस्टपासून निकाल लागेपर्यंत अयोध्या प्रकरणी सलग सुनावणी

6 ऑगस्टपासून निकाल लागेपर्यंत अयोध्या प्रकरणी सलग सुनावणी

6 ऑगस्टपासून अयोध्येतील राम मंदीर, बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी होणार आहे असा निर्णय सुप्रिम कार्टाने दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी निकाल लागेपर्यंत तीन दिवस चालणार आहे असं ही सुप्रिम कोर्टाने म्हटलं आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस ही सुनावणी होणार आहे.

अयोध्या प्रकरणी सलग तीन दिवस सुनावणी

अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे तर १५ व्या शतकात मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे.

गेले अनेक वर्ष हा वाद सुरुच आहे. निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली तर उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली.

गेल्या 26 वर्षापासून हा खटला सुरु आहे. आणि तो निकालात यावा यासाठी सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. राम मंदीर खटला लवकरात लवकर निकालात लागावा असंच याचिकाकर्त्यांच म्हणणं आहे.

मंगळवार, बुधवार, आणि गुरुवार असे तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यामुळे हा खटला निकालात येईल अशी याचिकार्त्यांची अपेक्षा आहे.

मध्यस्थ समितीने सुप्रीम कार्टासमोर अहवाल सुपूर्द केला होता. त्यातही तोडगा निघण्यासारखं काही नसल्याचं कार्टाने म्हटलं आहे.

 

#ayodhyacase #supremecourt #hearing

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version