Auto-Cab Fare Hike Demand: मुंबईत प्रवास महागणार? ऑटो-कॅब चालकांनी केली भाडेवाढीची मागणी, किती रूपयांनी होणार वाढ?

मात्र आता सर्वच इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे ऑटो, कॅब चालक अडचणीत आले आहेत. 
Auto-Cab Fare Hike Demand: मुंबईत प्रवास महागणार? ऑटो-कॅब चालकांनी केली भाडेवाढीची मागणी, किती रूपयांनी होणार वाढ?

सध्या देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याआधीच आखाती देशातील युद्धामुळे सीएनजीच्या किंमतीतही वाढ करण्यात आली होती. मात्र आता सर्वच इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे ऑटो, कॅब चालक अडचणीत आले आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, कॅब चालकांना दररोज सरासरी 15 किलो सीएनजी लागतो. त्यामुळे त्यांना महिन्याला जवळपास 800 ते 900 रुपये जास्त खर्च करावा लागतो. तर ऑटो रिक्षाचालकांच्याही खर्चातही महिन्याला 250 ते 300 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे.

हेही वाचा – Indian Mangoes In USA: भारताची 'मँगो डिप्लोमसी' जोरात! अमेरिकेत किती रुपये किलोने मिळतो भारतील आंबा?

सध्या रिक्षाचे दीड किलोमीटरचे किमान भाडे 26 रुपये आहे तर टॅक्सीचे किमान भाडे हे 31 रुपये आहे आणि चालक संघटनांनी रिक्षाचे भाडे आता 30 रुपये तर टॅक्सीचे भाडे हे 35 रुपये करण्याची मागणी केलेली आहे.

हेही वाचा – Cheapest Electric Scooter India 2026: पेट्रोल दरवाढीला पर्याय मिळाला; अवघ्या 45 हजारात घरी आणा ही इलेक्ट्रिक स्कूटर 1 रुपयात 4 किमी धावणार? 

याच दरम्यान सीएनजी दरवाढीनंतर मुंबईत शेअर रिक्षाचे भाडेही वाढलेले आहे. शेअर रिक्षासाठी किमान पंधरा रुपये मोजावे लागत आहे.  वाढत्या इंधन खर्चामुळेच हा आम्हाला निर्णय घ्यावा लागत आहे, असं चालकांचं म्हणणं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version