मंत्रालयासमोर महिला वकिलाकडून आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर महिला वकिलाकडून आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाबाहेर एका महिला विकलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांच्य विरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिला वकिलाने केला आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून वेळीच तेथे पोलीस पोहचल्याने अनर्थ होण्यापासून टळला.

पुण्यातील दौंड पोलीस उपअधीक्षकांनी छेडछाड करत चुकीचा गुन्हा नोंदविला असल्याचा आरोप महिला वकिलाने केला आहे. त्यामुळे ही तक्रार घेऊन मंत्रालयात आली होती. आपल्यावर अन्याय होत असल्यामुळे न्याय मिळण्याची मागणी महिला वकिलाने केली. मात्र न्याय मिळाला नसल्याचे महिला वकिलाचे म्हणणे आहे.

महिला वकिलाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करताच त्यावेळी पोलीस तेथे दाखल झाले. आणि त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. माझ्यावर अन्याय झाला असून मला न्याय मिळत नाही त्यामुळे आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचे महिला वकिलाने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version