‘राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न’ – अस्लम शेख

‘राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न’ – अस्लम शेख

  काँग्रसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे काशिफ खानसोबत संबंध आहेत. त्यामुळे अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी भाजप नेते मोहित कम्बोज यांनी केली. यावर अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांकडून केला जात असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

  मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, मी काशिफ खान नामक व्यक्तीला ओळखत नाही. आणि मी त्याला कधी भेटलोही नाही. मात्र पालकमंत्री म्हणून त्याने मला पार्टीचे आमंत्रण दिले होते. परंतु मी पार्टीला गेलो नाही. या प्रकरणामध्ये काही षडयंत्र आहे का? याचा तपास करावा लागेल. असे अस्लम शेख यांनी सांगितले.

  काशिफ खान एका ठिकाणी मला भेटला होता. त्यावेळी त्याने मला भेटूनच पार्टीचे आमंत्रण दिले. माझ्याकडे त्याचा नंबरसुद्धा नाही. तसेच मला ज्या कार्यक्रमांना जायचे असते त्या कार्यक्रमाची मी माहिती काढतो. मी पालकमंत्री असल्यामुळे मला दिवसभरात अनेक आमंत्रण येत असतात. मात्र मला ज्या कार्यक्रमात जायचे नसते त्या कार्यक्रमाची मी माहिती काढत नाही, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

  मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे काशिफ खानसोबत संबंध आहेत. त्यामुळे काशिफ खान अस्लम शेख यांना पार्टीला वारंवार बोलवत होता. ओळख असल्याशिवाय त्यांना वारंवार आमंत्रण कसे देण्यात आले? असा सवाल भाजप नेते मोहित कम्बोज यांनी उपस्थित केला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version