‘सिल्वर ओकवरील हल्ला पूर्वनियोजित’ – प्रकाश आंबेडकर

‘सिल्वर ओकवरील हल्ला पूर्वनियोजित’ – प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी आक्रमक कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत आंदोलन केले तर शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला असून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सिल्वर ओकवरील हल्ला पूर्वनियोजित असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला होणार असल्याचे पत्र पोलिसांना चार दिवस आधीच मिळाले होते. तसेच हे पत्र सह पोलीस आयुक्तांनाही देण्यात आले होते. या पत्रात सिल्वर ओकसह मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगला आणि वर्षा या शासकीय निवासस्थानी तसेच परबांच्या निवासस्थानी एसटी कर्मचारी हल्ला करू शकतात, असे नमूद करण्यात आले होते. ही बाब माहित असताना पोलीस विभागाच्या चुकीनेच सिल्वर ओकवर हल्ला झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच, या घटनेस जबाबदार असणाऱ्या सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची चौकशी व्हायला हवी होती. मात्र, त्याऐवजी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रमुख पदी त्यांनाच नियुक्त करणे हे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची भूमिका  

प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मंदिराच्या वर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यास हरकत नाही. मात्र, मशिदीसमोर हुनमान चालीसा लावणे हे दंगल घडविण्यासाटी प्रवृत्त करण्याची भूमिका राज ठाकरे घेत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version