राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वपक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. ऐन महानगपालिका निवडणुका तोंडावर असताना महायुतीला मात्र धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकतीच सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येची घटना ताजी असताना काल अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
#WATCH | Pune, Maharashtra | Shiv Sena leader Pramod Nana Bhangire said, "While I was holding a public meeting for election campaigning in a society near Shreeram Chowk, some people pelted stones at my car and also targeted our candidate Sarika Pawar…. The police have gone to… pic.twitter.com/u2oLbCyrpm — ANI (@ANI) January 8, 2026
असं असताना आता पुण्यातून शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वाहनावर दगडफेक करत हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात महानगपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत जिल्ह्यात सर्वत्र प्रचारांचा धडाका सूरू झाला आहे. पुण्यातील एका ठिकाणी नाना भानगिरे हे देखील एका ठिकाणी प्रचारासाठी गेले असता त्यांच्या गाडीवर दगड मारत हल्ला करण्यात आला या हल्ल्यात भानगिरे यांच्या गाडीची पुढची काच देखील डॅमेज झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सूरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर नाना भानगिरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तो कोण आहे त्याला अटक करा नाही तर माझ्या ताब्यात तरी द्या,असे आदेश पोलिसांना दिले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
दरम्यान राज्यातील महानगपालिका या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.