शिवसेना मंत्र्याच्या मुलाच्या गाडीवर हल्ला

मालेगावात दादा भुसेंच्या मुलाच्या गाडीवर हल्ला. संशयित गो तस्करांकडून हल्ला. आविष्कार भुसे आणि गो तस्करी करणाऱ्या वाहनांची धडक. <br/>अपघातात चार जण जखमी<br/>
शिवसेना मंत्र्याच्या मुलाच्या गाडीवर हल्ला

नाशिक: मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं समोर आलय. मालेगावात संशयित गो तस्करांचा मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे त्यांच्या दोन मित्रांसह असलेल्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडालीय. मालेगाव सटाणा रोडवर टेहेरे चौफुली येथे पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

काय आहे प्रकरण? 
मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत मालेगाव- सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे परत येत होते. यावेळी टेहेरे चौफुलीजवळ मागून संशयित गो तस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येत त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तसेच त्यांच्या गाडीला डीव्हायडरकडे दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोणेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला.

या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डीव्हायडरमध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. तर संशयित गो तस्कर यांच्या देखील गाड्या डीव्हायडरला ठोकल्या गेल्या. या अपघातामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान या हल्ल्याचा प्रयत्न कोणी आणि का केला असा प्रश्न सर्वानाच पडलाय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version