नवी दिल्ली : मै आतिशी… असं म्हणत आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना सिंग यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायब राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.
मद्य धोरण घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशांद्वारे गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना काही काळ तुरुंगात जावे लागले. अलिकडेच त्यांना जामीन मिळाला. पण आरोपींच्या यादीत केजरीवालांचे नाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी राजीनामा दिला. यानंतर आम आदमी पार्टीने एकमताने आतिशी यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. अखेर शनिवारी २१ सप्टेंबर रोजी आतिशी यांनी ईश्वराला साक्षी ठेवून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दिल्ली विधानसभेच्या आमदार असलेल्या आतिशी मार्लेना सिंग यांनी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय, महिला व बालकल्याण, शिक्षण अशा वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.
आतिशी मार्लेना सिंग यांची राजकीय कारकिर्द
दिल्ली विधानसभा निवडणूक – कालकाजी विधानसभा मतदारसंघ – २०२०
आतिशी मार्लेना सिंगच्या निवडीवर भाजपाची प्रतिक्रिया
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.