Ashok Kharat Case: धक्कादायक! अशोक खरातच्या जाळ्यात महिला अधिकारीही? चौकशीतून मोठी अपडेट समोर

एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat Case: धक्कादायक! अशोक खरातच्या जाळ्यात महिला अधिकारीही? चौकशीतून मोठी अपडेट समोर

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. महिलांवर अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली अमानवी कृत्ये केल्याच्या आरोपांनंतर आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन उच्चपदस्थ महिला अधिकारीही अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या महिला अधिकाऱ्यांनी स्वतःसह इतर काही व्यक्तींनाही खरातकडे नेल्याचे समोर येत असून त्यामुळे त्या अडचणीत आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा: Israel Attack On Pakistan Embassy: युद्धाचा भडका! इस्रायलचा तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासावर हवाई हल्ला, नेतन्याहू यांची चूक की रणनीती ?

दरम्यान, या महिला अधिकाऱ्यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) सोबत संपर्क साधल्याची माहितीही पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात एकामागोमाग एक धक्कादायक बाबी उघड होत असल्याने तपास यंत्रणांचे लक्ष अधिक तीव्र झाले आहे.

याशिवाय, अशोक खरातने केवळ महिलांवर अत्याचारच केले नाहीत, तर काही उच्चभ्रू व्यक्तींना आर्थिक फसवणूक करून मोठा गंडा घातल्याचीही माहिती समोर येत आहे. धर्म आणि अघोरी पूजेच्या नावाखाली लोकांना फसवून पैसे उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील चौकशी सुरू असून पुढील तपासातून आणखी मोठी नावे आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Petrol Diesel Excise Duty: मोठी बातमी! पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क घटलं, नागरिकांना मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version