Ashok Kharat Case : महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्ड, महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क…, भोंदू अशोक खरात प्रकरणाला मोठे वळण; तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान

स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्मांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडत असून, आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
Ashok Kharat Case : महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्ड, महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क…, भोंदू अशोक खरात प्रकरणाला मोठे वळण; तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान

स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्मांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडत असून, आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. भोंदूबाबा उर्फ अशोक खरातच्या मोबाईलमध्ये अडीच हजारांहून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नंबर ‘कोड’मध्ये सेव्ह केल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे. तसेच यावेळी खरातने पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तर आतापर्यंत खरातचे दोन मोबाईल जप्त झाले असून त्यातून डेटा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणी केली जाईल. यादरम्यान खरात प्रकरणाशी काही राजकीय कनेक्शनची असल्याची शक्यता असून तपास यंत्रणा याची पडताळणी करत आहे. यावेळी ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी होणार असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तावली जात आहे. तसेच खरातच्या मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक गतीने सुरू होण्याची शक्यात आहे. 

हेही वाचा- Congress Bhandara-Gondia : काँग्रेस खासदाराचे नशीब बलवत्तर! एकाच मार्गावर तिसऱ्यांदा अपघात; थोडक्यात बचावले
स्वयंघोषित ‘कॅप्टन’ भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. तो म्हणजे, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना देखील खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षांत नोंदच झाली नाही. त्यामुळे खरातला हा परवाना नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनडीएएल एएलआयएस ऑनलाइन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर यामुळे आता स्थानिक पोलीस स्टेशनसह अनाभिज्ञ, तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version