आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

भाजप नेते आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

आशिष शेलार यांना अज्ञाताकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी शेलारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे. तर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देत, याबाबत तपास करण्याची विनंतीसुद्धा त्यांनी केली आहे. ज्या भाषेत समोरचा अज्ञात व्यक्ती बोलत होता, त्यावरून हे धमकीचे प्रकरण अधिक गंभीर असल्याचे शेलारांनी पत्रात म्हटले आहे. तसेच आशिष शेलारांना आलेली धमकी पोलिसांनी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिले आहे. लोकप्रतिनिधींना धमक्या येण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रात लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version