आर्यनची सुटका, मात्र मुनमुन धामेचा नियमांत अडकली

आर्यनची सुटका, मात्र मुनमुन धामेचा नियमांत अडकली

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जंट यांचा जामीन मंजूर केला आहे. आणि अखेर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र मुनमुन धामेचाची तुरुंगातून सुटका झालेली नाही. मुनमुन धामेचा नियमांमध्ये अडकली असून मुनमुनला जामीन राहणाऱ्या व्यक्ती मिळण्याबाबत अनके अडचणी येत आहेत.

  एकीकडे आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे मुनमुनच्या तुरुंगातील सुटकेत अनेक अडचणी येत आहते. मुनमुनला जामीन मंजूर झाला असून मुनमुन नियमांच्या कचाट्यात सापडली आहे. मुनमुनला जामीनदार मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे मुनमुन धामेचाचे वकील उच्च न्यायालयात धावाधाव करताना दिसत आहेत.

  अँड बेंच यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धामेचाला तात्पुरत्या रोख रकमेवर जामिनावर सोडण्याची विनंती मुनमुन धामेचाच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तसेच मुनमुन ही मध्य प्रदेशची रहिवासी असल्यामुळे तीला जामीन राहणारी व्यक्ती शोधण्यात अडचणी येत असल्याचे बार अँड बेंचकडून सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version