‘आर्यनला यापूर्वीच जामीन मंजूर व्हायला हवा होता’ – नवाब मलिक

‘आर्यनला यापूर्वीच जामीन मंजूर व्हायला हवा होता’ – नवाब मलिक

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यातच आर्यन खानचा जामीन मंजूर झाला असून आज आर्यनची तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यनच्या सुटकेवर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया  दिली आहे. ‘आर्यनला यापूर्वीच जामीन मंजूर व्हायला हवा होता’, असे वक्तव्य नवाब मलिकांनी गोंदियात केले आहे.

  एनसीबीने आर्यन खानला खोट्या आरोपांमध्ये अटक केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ‘आर्यनला खोट्या आरोपांमध्ये अटक करून त्याला यापूर्वीच जामीन मंजूर व्हायला हवा होता’, असे म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे.

  नवाब मलिकांनी एनसीबीवर ताशेरे ओढत आर्यनच्या जामिनावर व्यक्तव्य केले आहे. समीर वानखेडे खोट्या कारवाया करत होते. तसेच एनसीबीने स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार करून निर्दोष लोकांना यामध्ये फसवले जात होते. समीर वानखेडे यांच्यासोबत काशिफ खानसुद्धा सहभागी आहे त्यामुळे काशिफ खानच्या विरोधात पुरावे देणार असल्याचे मलिकांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version