क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीनाला उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यन खानचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र आर्यन खानला आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खानच्या जामीनसंदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे ऑर्थर रोड तुरुंगात उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे.
आज सायंकाळी आर्यन खानची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आर्यन खानच्या जामीनसंदर्भातले महत्वाचे कागदपत्रे ५.३० वाजेपर्यंत ऑर्थर तुरुंगात पोहचणे आवश्यक होते. मात्र जामिनसंदर्भातील कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला आजही तुरुंगातच रहावे लागणार आहे. ‘कागदपत्रे तुरुंगात वेळेत पोहचणे आवश्यक आहे. कुणासाठीही वेळ वाढवली जाणार नाही. तसेच सर्वांसाठी समान नियम असणार असल्याचे’ तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.