15 दिवसांत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा- अंनिस

15 दिवसांत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा- अंनिस

इंदुरीकर महाराज यांनी आपत्यजन्माविषयी केलेल्या विधानावरून तापलेला वाद अजूनही शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. 15 दिवसांत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अहमदनगरच्या शल्य चिकित्सकांना या प्रकरणी अंनिसने नोटिस पाठवली आहे.

https://www.jaimaharashtranews.com/indurikar-maharajs-apology/

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. या वक्तव्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली होती.

https://www.jaimaharashtranews.com/trupti-desai-forces-system-to-arrest-indurikar-maharaj/

इंदुरीकर महाराजांनी त्यानंतर आपल्या विधानावर दिलगीरही व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या माफीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असं वाटलं होतं. मात्र अंनिस अजूनही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.

https://www.jaimaharashtranews.com/photo-gallery-indurikar-maharajs-chauvinistic-statements/

अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रकरणी अंनिसने नोटिस पाठवली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी योग्य कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही अंनिसने दिला आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version