मुंबई: माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी त्यांनी हे दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे त्यांनी म्हटले. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि आता अनिल परब यांनी अत्यंत मोठे दावे केले आहेत.
अनिल परब म्हणाले की, मी रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहे. रामदार कदम यांची नार्काे टेस्ट झालीच पाहिजे. योगेश कदम यांनी बापाचे उद्योग तपासले पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्राचा मी स्वत: साक्षीदार आहे. रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत. 1993 मध्ये कदमांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले की, जाळले हे तपासले पाहिजे, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी कदम यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना, 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांना जाळले हे तपासले पाहिजे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचे वाकून हे सुरू आहे. दारू पिऊन तिकडे खेडमध्ये काय धुमाकूळ घालता हे आम्ही अधिवेशनात मांडू असे म्हणत त्यांनी मोठा इशारा दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल शंका उपस्थित करता. रामदास कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. कदमांनी माफी मागावी नाही तर कायदेशीर कारवाईला सामोर जावं. आता कोर्टात फाईल करतो, कोण डॉक्टर ते समोर येऊ द्या. मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, मला कायदेशीर उत्तर हवं असल्याचेही परबांनी म्हटले.
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परब म्हणाले, रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा आहे. बाळासाहेब यांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का?रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी हे शक्य नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.