Amol Mitkari: ‘आज अजितदादा असते तर…’; विधान परिषदेची उमेदवारी हुकली, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादावर अमोल मिटकरी यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
Amol Mitkari: ‘आज अजितदादा असते तर…’; विधान परिषदेची उमेदवारी हुकली, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना उमेदवारीवरून विविध पक्षांत नाराजीचे सूर उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातही अशाच चर्चांना उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठींनी अमोल मिटकरी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर आता मिटकरी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांवर मिटकरी यांनी संयमित भूमिका घेतली. “जर अजित पवार आज असते, तर त्यांनी किमान मला फोन करून ‘यावेळी नाही, पुढच्या वेळी संधी देऊ’ असे सांगितले असते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात त्यांनी माझा निश्चित विचार केला असता, असेही त्यांनी नमूद केले.

मिटकरी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत सूचक इशाराही दिला. “मी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्याचेच हे फळ असेल, तर ‘सब्र का फल मीठा होता है’, आणि ते फळ  मी ते आनंदाने स्वीकारतो,” असे ते म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra Din Hostory: मोरारजी देसाईंचा ‘तो’ आदेश अन् 106 जणांची प्राणांची आहुती; महाराष्ट्र दिनानिमित्त वाचायलाच हवी अशी संघर्षाची गाथा

दरम्यान, त्यांनी स्पष्ट केले की या संदर्भातील त्यांची लढाई थांबलेली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी ते पुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यामुळे हा मुद्दा आगामी काळातही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

एकूणच, उमेदवारीवरून सुरू झालेल्या नाराजीच्या चर्चांवर अमोल मिटकरी यांनी संयमी प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यातील सूचक संदेशामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Bargi Dam Accident: क्रूझ दुर्घटनेत स्थानिक ‘देवदूत’ धावले; वादळी लाटांना झुंज देऊन वाचवले 14 जीव; प्रशासनाकडून मोठी मदत जाहीर

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version