मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांना दुखापत झाल्याची माहिती दिली.
हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगसाठी ते गेले होते. या ॲक्शन चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. १२ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करताना बिग बी जखमी झाले. त्यांच्या उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यानंतर शूटींग रद्द करण्यात आले.
हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ च्या ॲक्शन शॉट दरम्यान दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या उजव्या बरगडीचा स्नायू तुटला. यामुळे शूट रद्द केले. हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये त्यांचे सीटी स्कॅन देखील करण्यात आले. या दरम्यान डॉक्टरांनी सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे,” असे अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.