Amit Thackeray: पोलिसांना फ्री हँड द्यावा, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ड्रग्स प्रकरण, नाशिकमधील आरोप आणि संघटनात्मक बदलांवर भाष्य करत सरकारवर टीका केली.
Amit Thackeray: पोलिसांना फ्री हँड द्यावा, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. संघटनात्मक बदल, मुंबईतील ड्रग्स प्रकरण आणि नाशिकमधील कंपनीतील गंभीर आरोप या सगळ्यांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली.

संघटनात्मक बदलांची तयारी

अमित ठाकरे यांनी सांगितले की, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभर संपर्क अध्यक्ष नेमले असून आता ते स्वतः कार्यकर्त्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधणार आहेत. “आम्ही कुठे कमी पडतोय, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्यांकडून अभिप्राय घेऊन सविस्तर अहवाल तयार करून साहेबांना देणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. 25 आणि 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागात दौरा करून स्थानिक कार्यकर्ते आणि इतर संघटनांशीही संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Raju Patil : 'माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा'; मनसे नेते राजू पाटील यांची मागणी

मुंबईतील ड्रग्स प्रकरणावर संताप

मुंबईतील नेसको सेंटर येथे झालेल्या संगीत कार्यक्रमानंतर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. 'राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून? इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जात आहेत, हे भीषण आहे,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळांच्या परिसरातही ड्रग्स विक्री होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर कठोर टीका केली. 'पोलिसांना फ्री हँड द्या, कठोर कारवाई करा. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत,' असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ड्रग्सविरोधात प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक प्रकरणावर कठोर भूमिका

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप झाल्याच्या प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “अशा प्रकारांवर 100 टक्के ऑडिट झाले पाहिजे. प्रत्येक कंपनीत कोण काम करतंय, याची माहिती असणं आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर कडक शिक्षा झाली नाही, तर असे प्रकार वाढतच जातील.” त्यांनी पोलिसांना 24 तास मोकळे हात देण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

हेही वाचा: Akola Shivsena Politics: अकोल्यात शिंदे गट शिवसेनेला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सरकारवर थेट निशाणा

अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, 'ड्रग्सचा प्रश्न गंभीर आहे, पण सरकारकडे याचे ठोस आकडे आहेत का? एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स राज्यात येतात, यावर सरकार काय करतंय?' असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. तसेच, 'महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस नेतृत्वाची गरज आहे,' असे म्हणत त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. एकूणच, या पत्रकार परिषदेत अमित ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ड्रग्स समस्या आणि संघटनात्मक बदल यावर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version