Amit Shah On Dharmendra Pradhan Resignation : "तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे" धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
Amit Shah On Dharmendra Pradhan Resignation : "तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे" धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

कॉक्रोज जनता पार्टी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनानंतर अखेर विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण उजाडला. नीट पेपरफुटीच्या गदारोळात विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्याग केला. या घडामोडीनंतर लगेचच, जंतरमंतरवर गेल्या 1 महिनाभरापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरणात मोठा भूकंप आला आहे. या राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील सत्ताकीय समीकरणांमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या या निर्णयावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून, भाजपने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Thackeray Brothers Rally: ठाकरे बंधूंकडून विद्यार्थी आंदोलकांसाठी विजयी रैली! दादर पोलिसांकडून नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची प्रतिक्रिया
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “भाजपचे कार्य देशासाठी, आपल्या तरुण पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. आज केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे. पेपरफुटीसाठी दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या उपाययोजनांचे पालन केल्याने विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी होतील. आपल्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधानजींनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी, मातृभाषेतील परीक्षा पद्धती, पीएम श्री विद्यालयाचा विस्तार, डिजिटल शिक्षणाचे कौशल्य प्रदान करणे, उद्योग-शैक्षणिक समन्वयाचा विकास आणि बळकटीकरण या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. परीक्षा पद्धतीला अधिकाधिक विद्यार्थी-केंद्रित बनवण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न आहेत. ‘टेन्यूअर भरतला’ विकसित करण्याची संकल्पना त्यांना समर्पित आहे.”

हेही वाचा- Pralhad Joshi: कोण आहेत प्रल्हाद जोशी? पाच वेळा खासदार ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयापर्यंतचा प्रवास, जाणून घ्या

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची धुरा
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कारभार पाहणारे प्रल्हाद जोशी आता शिक्षण मंत्रालयाची धुराही सांभाळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणखी एका महत्त्वाच्या मंत्रालयाची भर पडली आहे. शिक्षण क्षेत्रातील सुरू असलेल्या आव्हानांचा सामना करणे, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला गती देणे, ही त्यांच्या समोरील प्रमुख आव्हाने असतील. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version