Amit Shah-Devendra Fadnavis Meeting : दिल्लीत अमित शाहा आणि फटणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; कोणते मोठे निर्णय होणार?

सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न सुरु असताना आज सरकारच्या शिष्टमंडळाने अमित शाहा यांची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.
Amit Shah-Devendra Fadnavis Meeting : दिल्लीत अमित शाहा आणि फटणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; कोणते मोठे निर्णय होणार?

सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न सुरु असताना आज सरकारच्या शिष्टमंडळाने अमित शाहा यांची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. एकीकडे राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकांच्या पार्शाभूमीवर जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

दरम्यान नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही काडीचाही सुगावा लागू न देता गुपचूप दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या ‘सिक्रेट’ भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून प्रचंड खळबळ उडाली.

अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या काही जागेवर महायुतीत शिवसेना आणि भाजप हे देन्ही पक्ष आग्रही आहेत, या  मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसेच अर्थखात्याबाबत सुनेत्रा पवारांच मत आणि विधान परिषदेवरुन शिवसेना, राष्ट्रवादीची मतं अमित शाहांसमोर मांडली असावी असं म्हटलं जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version