Thackeray Shinde Sena: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंचं वक्तव्य पक्षश्रेष्ठी गांभीर्याने घेणार?

शिवसेना एकत्र यावी की नाही? यावर उत्तर दिले आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 
Thackeray Shinde Sena: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंचं वक्तव्य पक्षश्रेष्ठी गांभीर्याने घेणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना एकत्र यावी की नाही? यावर उत्तर दिले आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या अशी इच्छा दानवेंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Satara-Sangli Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीसाठी शरद पवार गटाचा मोठा प्लॅन; एकाच जागेवर दोन दिग्गज नेत्यांना उमेदवारी? 

अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यावे वाटत का? यावर उत्तर देताना म्हणाले की, दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, बरेच वेळा वाटते. पण माझ्या एकट्याला वाटून काय फायदा? त्याचप्रमाणे ते म्हणाले की,  शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण पुढे काय होईल ते बघुया. दानवेंच्या या वक्तव्याने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version