विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार यादीत घोळ झाला आहे. त्यामुळे शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. 29 पैकी 24 प्रभाग डिटेल्स आयुक्त यांना दिले असताना यात 2 लाख 90 मतदारांची मूळ जागा बदलण्यात आली आहे. आजूबाजूला नाही तर तिसऱ्याच प्रभागात कुठंतरी टाकले आहे. 25 ते 30 टक्के मतदार नाव दुसऱ्या ठिकाणी गेले असून 1 लाख 75 मतदार असे आहेत की, ज्यांचे नाव जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आहे आणि महानगरपालिका निवडणुकीत देखील आहे. हे दुबार तीबार पेक्षा वेगळं आहे. नुसते तपासणी पाहणी करून होणार नाही, तर अधिकारी बेजबाबदारपणे काम करत असून, त्यांना निलंबित केले पाहिजे. काही ठिकाणी कुटुंबातील सर्वांचे नाव आहे, पण एकाचे नाव दुसऱ्याच कुठेतरी गेले. लोकसभेत जी नाव होती ती आता कशी काय उडाली? एक यंत्रणा महानगरपालिकेत बसली आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
24 प्रभागात 2 लाख 90 हजार मतदार मूळ जागेवर माझ्याकडे काही कागदपत्र आहेत, ज्यानुसार प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात नावे गायब आहेत तर काही दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. हजार नावांमध्ये कुठे पाचशे तर कुठे दोनशे नावे इकडेतिकडे झालेले आहेत. मतदार याद्या तपासून सीमा रचना पाहून असावेत, आयुक्त कुठे गुंतले माहिती नाहीत. त्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी आहे. एक महिन्यापूर्वी शिरसाट यांची चौकशी सुरू असल्याचं सांगितले मात्र त्यांनी मान्य केलं नाही. निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक असावी. कारण जे तपास करत आहेत ते अधिकारीच घोटाळ्यात आहेत. शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला आहे, सरकारने त्यांना पुढे करून हा गुन्हा केलेला आहे. ते एकटेच हे करू शकत नाही, त्यामुळे कोणीतरी त्यांच्या मागे आहे. सिडकोचे पद असताना अजितदादांच्या कोंढवा येथील घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे. देशाशी गद्दारी करणाऱ्यांना जमीन देणे गुन्हा आहे.
फडणवीस यांचे बगलबच्चे कापून काढू अशी भाषा करतात, तुमचे आमदार असे बोलतात आमच्या सारख्यानी वक्तव्य केलं तर गुन्हा दाखल होईल. आशिष देशमुख यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सापनाथ आणि नागनाथ आहेत, पैशांचा स्वीकार करा असा म्हणणारे आणि देणारे सारखेच आहेत. तुम्ही गुप्ततेत शपथ घेतली त्याला अर्थ नाही. बऱ्याच ठिकाणी युती तुटल्यात जमा आहे. प्रचारात कुठेही ते एकत्र नाही. बहुतांश ठिकाणी ते वेगळे लढत आहेत. कार्यकर्ते एकमेकांना शिव्या देतात, नेते काही बोलतात. शिंदे गट काही बोलू शकत नाहीत, त्यांचे हात बरबटले आहेत. श्रीकांत शिंदे काही बोलत असतील त्याला अर्थ नाही. शेतकऱ्यांना 65% शेतकऱ्यांच्या संख्येनुसार मदत मिळाली. 31 हजार 800 कोटी रुपयांच्या तुलनेत मदत झालेली नाही. 65% शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, मदत कमी प्रमाणात दिली. निवडणुकीचा प्रचार मतदान पेटी बंद करतात असा नियम आहे. मात्र अशी परवानगी का माहिती नाही. प्रचार बंद करूच नका, सुरू ठेवा. निवडणूक आयोग मनाला येईल अस का वागते माहीत नाही. माणिक राव कोकाटे म्हणतात, ते बरोबर आहे. लोकांना खोटे आश्वासन देणे कितपत योग्य, कोकाटे कडू बोलतात पण योग्य बोलतात.
मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, संभाजीनगर मनपा याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे काल 2500 तक्रारी आल्या. मी आयुक्तांशी बोललो, त्यांनी 300-400 जणांचे पथक तयार केले आहे, या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी.24 नंबरच्या प्रभागातले 13307 मतदार 26 प्रभागत गेले. यात संजयनगर भागातील पूर्व मतदार संघाचे असून तो देवळाई सातारा म्हणजे पश्चिम मधे गेला आहे. (यादी दाखवत) यादी बदलली इतक्या मोठ्या प्रमाणात ही घोडचूक आहे.जाहिरात देऊन या सर्व प्रकरणाचा निपटारा करा अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. या चुका जर दुरुस्त झाल्या नाही तर मतदानाच्या दिवशी प्रचंड प्रमाणात घोळ होईल. हे मुद्दामून नाही हा हलगर्जीपणा आहे असे मंत्री संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.