Ambadas Danve : उद्धव ठाकरे यांचे खासदार शिंदेंच्या संपर्कात?; अंबादास दानवेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले.
Ambadas Danve : उद्धव ठाकरे यांचे खासदार शिंदेंच्या संपर्कात?; अंबादास दानवेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

धाराशिव : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सर्व जागा ताकदीने लढत आहे. धाराशिव-लातूर-बीडची जागाही आम्ही पूर्ण ताकदीने लढत आहोत. मात्र सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत नवीन तंत्र वापरले जात असून, इलेक्शन होण्याऐवजी ‘सिलेक्शन’ व्हावे, यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप दानवे यांनी केला. यावेळी त्यांनी चर्चेत असलेल्या “ऑपरेशन टायगर” प्रकरणाचाही उल्लेख करत, “गेल्या दोन वर्षांपासून याबाबत चर्चा सुरू आहे. आमच्यातील काही लोकं उघडपणे बोलत आहेत. आता याबाबत अधिकृत कबुली देणे गरजेचे आहे,” असे वक्तव्य दानवे यांनी केले. मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला, परंतू बारा वर्षांमध्ये लोकशाही पूर्णपणे संपवण्याचे काम भारतीय जनता पार्टी या देशात करत आहे, असेही दानवे यांनी नमूद केले. 

हेही वाचा : Rohit Pawar Hunger Strike Pandhapur: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी काढा; पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, मागण्यांवर ठाम

दरम्यान, लोकसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष झाली आहेत. या दोन वर्षात अशी चर्चा आहे. शिवाय महिन्याला, दर दोन महिन्याला अशी चर्चा होतच असते. काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहीत आहे. मात्र दर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते. आता हे अधिकृत कबूल करायला हवं, असं मोठं विधान आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असतील या चर्चेला दुजोरा दिला आहे. धाराशिवमध्ये अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र ओमराजे निंबाळकर अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली. ओमराजे निंबाळकर बैठकीला गैरहजर का?, असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी उत्तर देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version