विधानपरिषद निवडणुकीसाठी नेत्यांची लगबग

विधानपरिषद निवडणुकीसाठी नेत्यांची लगबग

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारमधील पक्षाचे नेते आमश्या पाडवी यांना संधी दिली जाईल अशी माहिती समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांसाठीही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असून शिवसेनेच्या दोन उमेदवारांची नावे समोर आली आहेत. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

आमशी पाडवी हे मुळचे शिवसैनिक आहे. शिवसेनेत ते अनेक दिवसांपासुन काम करत आहेत. शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केले आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसताना शिवसेनेला रूजवण्याचं काम त्यांनी केले आहे. ते नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतरदारसंघातून २०१४ ते २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी याच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही पराभव पत्करायला लागला होता. पण २०१९च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version