Akhil Chitre : ‘एक डोनाल्ड डक पाण्यात स्टंट करतो, मिडिया कॅमेऱ्यासमोर पोझ देत फिरतो’; मुंबईकरांच्या मरणावर हसणाऱ्या नेत्याला अखिल चित्रेंनी सुनावले खडेबोल

Akhil Chitre : ‘एक डोनाल्ड डक पाण्यात स्टंट करतो, मिडिया कॅमेऱ्यासमोर पोझ देत फिरतो’; मुंबईकरांच्या मरणावर हसणाऱ्या नेत्याला अखिल चित्रेंनी सुनावले खडेबोल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्षांवर एक्स पोस्टच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण झाली आहे. जागोजागी पाणी साचल्याचे चित्र दिसत असून झाड पडले, मॅनहोलमध्ये माणूस पडणे, या घटनांमुळे दोन जणांचे मृत्यूदेखील झाले आहेत. यावर सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेबाबत अखिल चित्रे यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना त्यांनी उपहासात्मक डोनाल्ड डकची उपमा दिली आहे. 

काय म्हटले आहे पोस्टमध्ये – 

मुंबईत एक स्वतःला नेता म्हणवणारा ‘डोनाल्ड डक’ मोकाट सुटलाय, हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो, आणि हा Donald duck पाण्यात स्टंट करतो, मिडिया कॅमेऱ्यासमोर पोझ देत नौटंकी करत फिरतो, बावचळलाय अगदी. कृपया महापालिका अधिकाऱ्यांना विनंती आहे, कुठे सापडला तर वीरमाता जिजाऊसाहेब उद्यानात सुरक्षित ठेवावा. कारण ह्याच्या फिरल्याने मुंबईकरांचं मनोरंजन कमी आणि संतापच जास्त होत आहे.

हेही वाचा : Mumbai Rain Update : पावसाचा वाहतुकीवर परिणाम! हायवेवर गाड्यांचा रांगा, रस्त्यांवर गुडघाभर पाणी, सबवे तुंबले; मुंबईकरांचा परतीचा मार्ग कठीण

दरम्यान, अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमधील टीकेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, गेल्या आठवड्यात पाऊस पडला. तेव्हा मुंबईची काय परिस्थिती झाली हे मुंबईकरांनी अनुभवलंय. एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला. सुदैवाने तो वाचला. त्यानंतर महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतला नाही. आणि परवाचा जो प्रकार घडला, एक माणूस मॅनहोलमध्ये पडला आणि यांच्या लापरवाहीमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला. यावर एक मूर्ख नेता हसतो काय, एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर. आधी शाळेच्या बसवर झाड कोसळून एक लहान मुलाचा मृत्यू झाला. तुम्हाला या दोन्ही गोष्टीचं हसू येतं…हसून सांगता. गेल्या आठवड्यात महापौर आनंद लुटा म्हणून सांगताहेत. आणि लोकं मरीन लाईन्सला आनंद लुटतायंत. त्यांना विचारतायं तुम्ही इथे काय करता. आणि दुसरा तो सुपर कॉन्स्टिट्युशनल महापौर तो तिकडे वीरा देसाई रोडला पाण्यात फिरतोय. सहाय्यक आयुक्तांकडून वदवून पत्रकारांसमोर हा सकल भाग आहे म्हणून. आणि सकल भाग असला तरी इतके वर्ष तिथे कधी पाणी भरलं नाही. ते तुमच्या कार्यकाळातच कसं काय पाणी भरलं. म्हणून मी लिहिलंय अंधेरीचा डोनाल्ड डक पावसाचा आनंद लुटत. भ्रष्टाचाराच्या पाण्यात फिरत आहे आणि मुंबईकर जनतेने त्याची नोंद घेतली आहे. मी विनंती करतो मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनादेखील डोनाल्ड डक तिकडे फिरतोय, त्याच्या फिरण्याने कोणाला आनंद मिळत नाही. मात्र त्याच्या वागण्या बोलण्यामुळे मनस्ताप होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version