Ajit Pawar : दादांच्या निधनानंतर कट्टर समर्थकानेही त्यागले प्राण, अंत्यविधीवरुन परतताना करुण अंत

यानंतर ते दुचाकीवरुन नाशिकला रवाना झाले आणि...
Ajit Pawar : दादांच्या निधनानंतर कट्टर समर्थकानेही त्यागले प्राण, अंत्यविधीवरुन परतताना करुण अंत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अशातच नाशिकच्या दिंडोरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी त्यांना समजली. कट्टर दादा समर्थक असलेले सुदाम बोडके त्या बातमीनं हळहळले. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर ते दुचाकीवरुन नाशिकला रवाना झाले.

हेही वाचा – Virat Kohli: धक्कादायक! कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक? 

अजित पवार यांच्या निधनानं सुदाम बोडके यांना जबर धक्का बसला. ते अक्षरश: कोलमडले होते. नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे सुदाम बोडके एका खासगी दवाखान्यात गेले. पण तिथे त्यांची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांसमोर ते अचानक कोसळले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

हेही वाचा – Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत? महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीवर केंद्राचा थेट प्रहार 

अजित पवार यांच्या विमानाला काल सकाळी बारामतीत अपघात झाला. त्यात त्यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत अंत्यविधी करण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. दादांच्या अकाली निधनानं पोरके झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version