अजित पवारांचा यू टर्न

गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या २४ तासांमध्येच घुमजाव केलं आहे.
अजित पवारांचा यू टर्न

मुंबई : गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या २४ तासांमध्येच घुमजाव केलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. त्यामुळे या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे, तसेच अदानी बैठकीला उपस्थित नव्हते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या यू टर्नची राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनीही यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गौतम अदानी कोणत्याही राजकीय विषयांवरील बैठकीला उपस्थित नसल्याचे म्हटलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version