बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत

बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत

बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत

बारामती, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीच्या दिशेने जात असताना कृषी उद्योग मूल संस्थेच्या माध्यमातून चार जेसीबींच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली. सोबतच ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून बारामतीत ते गेले नव्हते. तर शनिवारी अजित पवार बाराममतातीत गेले असता बारामतीकरांनी अजित पवारांचं जंगी स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना आव्हान देत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

बारामतीकरांनी केले अजित पवारांचे जंगी स्वागत

अजित पवार बारामतीमध्ये पोहचताच त्यांच्यावर जेसिबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच जेसिबीच्याच साहाय्याने त्यांना हार घालत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा मतदारसंघ बारामती असून दुतर्फा कार्यकर्त्यांची आणि इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी स्वागतासाठी पाहायला मिळाली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version